आयकर कारवाईविरोधातील काँग्रेसची याचिका फेटाळली

काँग्रेस पक्षाविरुद्ध पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही सुरू करण्याच्या आयकर (आयटी) विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी काँग्रेस पक्षाची याचिका...
आयकर कारवाईविरोधातील काँग्रेसची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाविरुद्ध पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही सुरू करण्याच्या आयकर (आयटी) विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी काँग्रेस पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

न्या. यशवंत वर्मा आणि न्या. पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने काँग्रेसची रिट याचिका फेटाळून लावली. २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षांच्या कर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकांवर उच्च न्यायालयाने २० मार्च रोजी आपला आदेश राखून ठेवला होता. काँग्रेसचे वकील अभिषेक सिंघवी यांनी असा युक्तिवाद केला की, कर पुनर्मूल्यांकन कार्यवाहीला विशिष्ट मर्यादा आहे. आयकर विभाग जास्तीत जास्त सहा वर्षांपर्यंत मागे जाऊ शकतो. मात्र, हा युक्तिवाद न्यायालयात मान्य झाला नाही. आयकर खात्याने सांगितले की, काँग्रेसवर कारवाई करताना कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in