Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; कोर्टाने फेटाळली ती महत्त्वपूर्ण याचिका

उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात केली होती याचिका
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; कोर्टाने फेटाळली ती महत्त्वपूर्ण याचिका
Published on

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला होता. मात्र, यावर नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात दिल्ली कोर्टात नाशिक केली होती. मात्र, आता दिल्ली कोर्टाने ठाकरे गटाची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. ठाकरे गटाने 'शिवसेना' या नावासाठी आणि 'धनुष्यबाण' या चिन्हासाठी कोर्टात धाव घेतली होती.

अंधेरी पोट निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव गोठवले होते. त्यानंतर शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव तात्पुरतं दिलं होतं. पण ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णायाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. एवढेच नव्हे तर पक्षचिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गट यापुढे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in