केजरीवालांच्या याचिकेवर म्हणणे मांडण्याचे सीबीआयला आदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविला असून त्याप्रकरणी जामीन मिळण्याची मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविला असून त्याप्रकरणी जामीन मिळण्याची मागणी केजरीवाल यांनी केली आहे. त्याबाबत म्हणणे मांडण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला दिले.

न्या. नीना बन्सल कृष्णा यांनी सीबीआयला नोटीस पाठविली असून त्यावर १७ जुलै रोजी पुढील सुनावणी घेण्याचे मुक्रर केले आहे. सीबीआयने नोंदविलेल्या प्रकरणात अटक गरजेची नाही आणि आपल्याला दिलेली कोठडी बेकायदेशीर आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in