
नवी दिल्ली: कालका देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सेवेकऱ्याने प्रसाद आणि देवीची चुनरी न दिल्याने राग आला आणि त्यांनी थेट सेवेकऱ्याला दाडक्यांनी मरेपर्यंत मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
या बाबत पोलिसांनी सांगितले की, कालकाजी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. कालकाजी मंदिर परिसरात वाद सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.
काही प्रत्यक्षदर्शीन सांगितले की, आरोपींनी दर्शन घेतले, पण त्यांना प्रसाद आणि देवीची चुनरी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी सेवेकऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
अन्य आरोपींचा शोध सुरू
कालकाजी पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले. तर एकाला मंदिरातील लोकांनी पकडले. त्याची ओळख पटली असून, अतुल पांडे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सध्या पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.