Delhi MCD Result : भाजपच्या १५ वर्षाच्या सत्तेला 'आप'ने लावला सुरुंग; दिल्ली महापालिका निवडणुकीत बहुमताचा आकडा पार

दिल्ली महापालिका निवडणुकीत 'आप'ला २५० पैकी १३४ जागा तर भाजपला १०४ जागा मिळाल्या. आपने १२५ हा बहुमताचा आकडा पार केला. (Delhi MCD Result)
Delhi MCD Result : भाजपच्या १५ वर्षाच्या सत्तेला 'आप'ने लावला सुरुंग; दिल्ली महापालिका निवडणुकीत बहुमताचा आकडा पार

गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला (BJP) दिल्ली महापालिका निवडणुकीत (Delhi MCD Result) आपने (AAP) सुरुंग लावला. सलग चौथ्यांदा सत्ता काबीज करण्याचे स्वपन पाहणाऱ्या भाजपला २५० पैकी १०४ जागांवर विजय मिळवता आला. तर, आपने १३४ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला. दिल्ली महापालिकेत बहुमतासाठी १२५ जागांची आवश्यकता होती. या निवडणुकीत काँग्रेसला ७ जागांवर विजय मिळवता आला आहे. नवी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आपचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिल्लीच्या जनतेचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, "भाजपाने अनेक मार्गावर आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला केंद्र सरकारची मदत हवी आहे. आम्हाला पंतप्रधान आणि केंद्राच्या आशीर्वादाची गरज आहे. मी सर्व पक्ष आणि उमेदवारांना आवाहन करतो की, आजपर्यंत आपण राजकीय वाद घातले. मात्र आता आपल्याला एकत्र काम करायचे आहे. आम्हाला भाजपा आणि काँग्रेसचे सहकार्य हवे आहे. आपण एकत्र येऊन दिल्लीतील समस्या सोडवू." अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in