दिल्ली मद्य धोरण घोटाळा : मंत्री कैलाश गेहलोत 'ईडी'समोर हजर

मद्य धोरण ठरविणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या मंत्र्यांच्या गटामध्ये केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यासह गेहलोत यांचाही सहभाग होता. दक्षिणेकडील मद्य लॉबीने 'आप' आणि त्या पक्षाच्या नेत्यांना १०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा : मंत्री कैलाश गेहलोत 'ईडी'समोर हजर

नवी दिल्ली : मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीचे मंत्री आणि 'आप'चे नेते कैलाश गेहलोत सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) शनिवारी चौकशीसाठी हजर झाले. कैलाश गेहलोत हे नजफगडचे आमदार असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात परिवहन, गृह आणि विधिमंत्री आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार जबाब नोंदविण्यासाठी त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले.

मद्य धोरण ठरविणाऱ्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या मंत्र्यांच्या गटामध्ये केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यासह गेहलोत यांचाही सहभाग होता. दक्षिणेकडील मद्य लॉबीने 'आप' आणि त्या पक्षाच्या नेत्यांना १०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मद्य धोरणाची आखणी आणि अंमलबजावणीमध्ये अनियमितता झाल्याप्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. त्यानुसार ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

logo
marathi.freepressjournal.in