Air India : धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाने केली महिला प्रवाशावर लघुशंका

एअर इंडियामध्ये (Air India) घडलेल्या या प्रकारामुळे आता सुरक्षा आणि व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Air India : धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाने केली महिला प्रवाशावर लघुशंका

एअर इंडियाच्या (Air India) न्यूयॉर्कमधून दिल्लीला येत असलेल्या विमानामधील एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका मद्यधुंद व्यक्तीने ७० वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. विमान वाहतूक नियामक मंडळाने (डीजीसीए) आणि एअर इंडियाने दखल घेतली असून कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. हा प्रकार २६ नोव्हेंबरला घडला असून संबंधित महिलेने तक्रार केल्यानंतरही अद्याप एअर इंडियाने याबाबत कोणतीही कारवाई केली नव्हती. अखेर त्या महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.

डीजीसीएने याबद्दल सांगितले आहे की, आम्ही एअरलाइनकडून अहवाल मागवला आहे. या घटनेबाबत निष्काळजीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने या घटनेनंतर एक समिती गठित केली आहे. त्या प्रवाशाला 'नो-फ्लाई लिस्ट' मध्ये टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधून संबंधित महिला प्रवास करत होती. प्रवासादरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने संबंधित महिलेवर लघुशंका केली. हा सर्व प्रकार त्या महिलेने उपस्थित केबिन क्रूला सांगितला. त्यानंतरही त्या वक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यांनतर महिलेने घटनेची चौकशी व्हावी म्हणून टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. त्यानंतर या प्रकरणाला वेग आला आणि एअर इंडियाने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. संबंधित पत्रात महिलेने लिहिले आहे की, मद्यधुंद अवस्थेत असलेला एक प्रवासी माझ्यासमोर आला. त्याने माझ्यासमोर लघुशंका केली. याची दखल क्रू मेंबरकडूनदेखील घेण्यात आली नाही. मला क्रू मेंबरकडून प्रतिसाद उशीरा मिळाला. लघुशंका केल्यामुळे माझे कपडे आणि इतर वस्तू खराब झाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in