Delhi Shocker: कोर्टाने दिली नार्को टेस्टची परवानगी, आता सर्व सत्य बाहेर पडणार?

तपासासाठी सहकार्य करत नसल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केली होती आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी, कोर्टाने दिली परवानगी
Delhi Shocker: कोर्टाने दिली नार्को टेस्टची परवानगी, आता सर्व सत्य बाहेर पडणार?

दिल्लीतील (Delhi) श्रद्धा हत्याकांडमध्ये आता आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. कारण, आता दिल्ली पोलिसांना आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्यास परवानगी मिळाली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने यासाठी मंजुरी दिली. त्यामुळे श्रद्धा हत्याकांडमध्ये आणखी काय खुलासे होतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, पोलिसांसमोर अजून आव्हाने आहेत. हत्या कोणत्या शस्त्राने झाली? याचा शोध सुरू आहे. तसेच, पोलिसांनी नार्को टेस्टची मागणी करताना आरोपी सहकार्य करत नसल्याचेही सांगितले.

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबच्या स्वयंपाकघरातून पोलिसांना रक्ताचे अंश सापडले आहेत. आफताबच्या फ्लॅटमधून सापडलेल्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. जर हे रक्त माणसाचे असेल तर पोलिस श्रद्धाच्या वडिलांना डीएनए मॅचिंगसाठी दिल्लीला बोलावू शकतात. यापूर्वी पोलिसांना मृतदेहाचे १३ तुकडे सापडले होते, जे मानवी वाटतात. याची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणीही केली जाणार आहे. दिल्ली पोलिसांनी बंबल या डेटिंग अ‌ॅपवरून अहवालही मागवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in