Delhi-Pune Flight: दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची धमकी ; सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं

विमान विमानतळावर उतरल्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढून संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली.
Delhi-Pune Flight: दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची धमकी ; सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं
Published on

दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. विमान विमानतळावर उतरल्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढून संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. आज जीएमआर कॉल सेंटरला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला होता.

दिल्ली विमानतळावर असलेल्या दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात होती. विस्तारा कंपनीच्या विमानात हा बॉम्ब असल्याची ही धमकी होती. यानंतर सर्व प्रवाशांना विमानाच्या बाहेर काढून विमानाची तपासणी सुरु करण्यात आली. तपासणीअंती विमानात कोणताही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, या विमानाची तपासी करण्यात आल्यानंतर कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळली नाही. विमानाची संपूर्ण तपासणी झाली असून सर्व प्रवाशांना विमानत बसवून थोड्याच वेळाने विमान पुण्याकडे रवाना होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in