रामलीला मैदान यंदा फक्त तीन दिवस उपलब्ध; बुकिंगचा खर्च लाख रुपयांवर

दिल्लीतील निदर्शनांसाठी निश्चित केलेल्या तीन नवीन ठिकाणांपैकी एक असलेल्या रामलीला मैदानावर आंदोलन करणे ही एक कठीण आणि खर्चिक बाब ठरू शकते.
रामलीला मैदान यंदा फक्त तीन दिवस उपलब्ध; बुकिंगचा खर्च लाख रुपयांवर
रामलीला मैदान यंदा फक्त तीन दिवस उपलब्ध; बुकिंगचा खर्च लाख रुपयांवर
Published on: 

नवी दिल्ली : दिल्लीतील निदर्शनांसाठी निश्चित केलेल्या तीन नवीन ठिकाणांपैकी एक असलेल्या रामलीला मैदानावर आंदोलन करणे ही एक कठीण आणि खर्चिक बाब ठरू शकते. यंदा हे मैदान केवळ तीन दिवसांसाठी उपलब्ध आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५०,००० लोकांची क्षमता असलेल्या या मैदानाचे बुकिंग यंदा २९, ३० आणि ३१ डिसेंबरसाठीच करता येईल. मैदानाचा बुकिंग दर ५०,००० रुपये प्रति दिवस आहे, त्यासोबत ५५,००० रुपयांची सुरक्षा ठेव भरावी लागते. जी नंतर परत मिळते. करांसह एका दिवसाच्या बुकिंगसाठी सुरुवातीचा खर्च १.२१ लाख रुपये होतो," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मैदानातील एक छोटासा भाग आंदोलने आणि सभांसाठी मोकळा आहे, परंतु त्याची क्षमता केवळ १५० लोकांची आहे. या मैदानाचे बुकिंग मनपाच्या उद्यान विभागामार्फत केले जाते, जे यासाठी परवानगी देते. महापालिकेकडून अर्जाला मंजुरी मिळण्यापूर्वी दिल्ली पोलिसांचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' घेणे अनिवार्य आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, जंतरमंतर हे ठिकाण आंदोलनांसाठी रद्द करण्यात आले असून, त्याऐवजी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान ही ठिकाणे आंदोलने आणि निदर्शनांसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in