Delhi Shocker: ओळख लपवण्यासाठी जाळला तिचा चेहरा; श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताबची कबुली

दिल्लीमध्ये (Delhi Shocker) झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आरोपी आफताबने केलेल्या खुलाशांनी संपूर्ण देश हादरला.
Delhi Shocker: ओळख लपवण्यासाठी जाळला तिचा चेहरा; श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताबची कबुली

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Delhi Shocker) पकडण्यात आलेल्या आरोपी आफताब पुनावालाने पोलिसांसमोर अनेक बाबींचा खुलासा केला आहे. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा जाळल्याची कबुली आफताबने पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर शरिराची विल्हेवाट कशी लावायची? याबाबत इंटरनेटवरून माहिती घेतल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले.

दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धाची हत्या तिचाच प्रियकर आफताबने सहा महिन्यांपूर्वी केली होती. त्याने हा खूप १८ मे रोजी केल्याची कबुली स्वतः पोलिसांना दिली आहे. हत्येच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन घरातील फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर सलग १६ दिवस दिल्लीच्या मेहरोली जंगलात विविध ठिकाणी तिच्या शरीराचे अवयव फेकले. या अवयवांचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या जंगलामध्ये साधारण १० ते १२ हाडे सापडली आहेत. ही हाडं श्रद्धाचीच आहेत का हे तपासण्यासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आरोपी सातत्याने जबाब बदलवत असून पोलिसांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी साकेत कोर्टाकडे करण्यात आली. साकेत कोर्टाने ही मागणी मान्य केली असून लवकरच त्याची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. गुरुवारी साकेत कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. कोर्टाने आफताबच्या पोलिस कोठडीत ५ दिवसांची वाढ केली आहे. आरोपींला हिमाचलच्या पार्वती खोऱ्यात आणि दिल्लीच्या जंगलात नेऊन सीन रीक्रिएट करणार असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in