दिल्लीत SIR विरोधात सर्वपक्षीय आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चासह विविध कामगार संघटना, विद्यार्थी संघटना आणि डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी राजधानी दिल्लीत मोठा मोर्चा काढला.
दिल्लीत SIR विरोधात सर्वपक्षीय आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीत SIR विरोधात सर्वपक्षीय आंदोलन; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीX|'पीटीआय'च्या व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
Published on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल परीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चासह विविध कामगार संघटना, विद्यार्थी संघटना आणि डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी राजधानी दिल्लीत मोठा मोर्चा काढला. या आंदोलनप्रकरणी १०० जणांना ताब्यात घेण्यात आले.

भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावून मोर्चा रोखला.

संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) आणि 'पीपल अगेन्स्ट एसआयआर' या जनसंघटनेच्या दिल्ली समन्वय समितीने या मोर्चाचे आयोजन केले होते. गोले डाकखान्याजवळून मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलकांच्या हातात राष्ट्रध्वज आणि मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया थांबविण्याची मागणी करणारे फलक होते.

ज्ञानेश कुमारांविरोधात घोषणाबाजी

यावेळी आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात घोषणाबाजी केली. 'ज्ञानेश कुमार, राजीनामा द्या', 'एसआयआर थांबवा' आणि 'मतचोरी सहन करणार नाही', अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात विद्यार्थी, युवक आणि शेतकरी सहभागी झाले होते. माकपच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांच्यासह अखिल भारतीय लोकशाही महिला संघटना (एआयडीडब्ल्यूए) आणि अखिल भारतीय लोकशाही विद्यार्थी संघटनेचे (एआयडीएसओ) सदस्यही आंदोलनात सहभागी झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in