दिल्ली ‘आप’ मंत्र्याचा राजीनामा; पक्षालाही रामराम

दलित आमदार, नगरसेवक आणि मंत्र्यांचा ‘आप’ आदर करीत नाही, आपण सर्वसमावेशक समाजात राहतो, या सर्व बाबींचा आपल्याला आता उबग आला आहे त्यामुळे पक्षात राहणे कठीण आहे म्हणून आपण पदाचा राजीनामा देत आहोत, असे आनंद यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
दिल्ली ‘आप’ मंत्र्याचा राजीनामा; पक्षालाही रामराम

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या ‘आप’ला बुधवारी जोरदार धक्का बसला. आम आदमी पार्टीत दलितांना प्रतिनिधित्व दिले जात नसल्याचा आरोप करून दिल्ली मंत्रिमंडळातील समाजकल्याणमंत्री राजकुमार आनंद यांनी बुधवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पक्षालाही रामराम केला. ‘आप’च्या उच्चपदस्थ नेत्यांमध्ये एकही दलित नाही.

दलित आमदार, नगरसेवक आणि मंत्र्यांचा ‘आप’ आदर करीत नाही, आपण सर्वसमावेशक समाजात राहतो, या सर्व बाबींचा आपल्याला आता उबग आला आहे त्यामुळे पक्षात राहणे कठीण आहे म्हणून आपण पदाचा राजीनामा देत आहोत, असे आनंद यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. देशातील राजकारण बदलले की देश बदलेल, असे केजरीवाल यांनी जंतरमंतर येथून सांगितले होते. मात्र, राजकारण बदलले नाही तर राजकीय नेते बदलले, असे आनंद म्हणाले. राजीनाम्याच्या वेळेबाबत विचारले असता आनंद म्हणाले की, राजीनाम्याचा आणि वेळेचा संबंध नाही. आम्हाला लक्ष्य केले जात आहे, अशी कालपर्यंत आमची समजूत होती. मात्र, आमच्याकडूनच काही तरी चुकीचे घडले, असे उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वाटत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in