दिल्लीचे तापमान ४.९ अंश

हवामान खात्याने सांगितले की, हरयाणातील हिस्सार येथे किमान तापमान ४.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
दिल्लीचे तापमान ४.९ अंश
PM

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात गेल्या काही दिवसांपासून बर्फ पडत असल्याने पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अन्य राज्यांत थंडी पडत आहे.

दिल्लीत शुक्रवारी ४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. सिमल्यापेक्षाही दिल्लीत अधिक तापमान नोंदवले. सिमल्यात किमान तापमान ६.८ अंश नोंदवले.

हवामान खात्याने सांगितले की, हरयाणातील हिस्सार येथे किमान तापमान ४.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. देशाच्या विविध भागात थंडीमुळे दृश्यमानता ५०० मीटरपेक्षा कमी होती, तर मध्य प्रदेश, राजस्थानसह किमान ७ अंश तापमान नोंदवले गेले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in