प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीने देशात गाठली सर्वोच्च पातळी

ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या उपग्रह आधारित नवीन मूल्यांकन अहवालानुसार ‘पीएम २.५’ प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीने देशात सर्वोच्च पातळी गाठली आहे.
प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीने देशात गाठली सर्वोच्च पातळी
प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीने देशात गाठली सर्वोच्च पातळी
Published on

नवी दिल्ली : ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राच्या उपग्रह आधारित नवीन मूल्यांकन अहवालानुसार ‘पीएम २.५’ प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीने देशात सर्वोच्च पातळी गाठली आहे. मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात दिल्लीतील वार्षिक सरासरी ‘पीएम २.५’ एका घनमीटरमध्ये १०१ मायक्रोग्राम नोंदवली गेली, जी राष्ट्रीय मर्यादेच्या (४० मायक्रोग्राम) अडीच पट आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या तब्बल २० पट अधिक आहे.

या यादीत चंदिगड (७० मायक्रोग्राम) दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यानंतर हरयाणा (६३) आणि त्रिपुरा (६२) यांचा क्रमांक लागतो. आसाम (६०), बिहार (५९), पश्चिम बंगाल (५७) आणि पंजाब (५६) यासह इतर अनेक राज्यांनीही राष्ट्रीय मानकांचे उल्लंघन केले आहे. देशातील एकूण ७४९ पैकी ४४७ जिल्ह्यांमध्ये (सुमारे ६० टक्के) वार्षिक ‘पीएम २.५’ मर्यादा ओलांडली गेली आहे. सर्वाधिक प्रदूषित ५० जिल्ह्यांमध्ये दिल्ली आणि आसामच्या प्रत्येकी ११ जिल्ह्यांचा मोठा वाटा आहे, त्यापाठोपाठ बिहार आणि हरयाणाचा (प्रत्येकी ७) क्रमांक लागतो.

logo
marathi.freepressjournal.in