पंतप्रधान मोदी यांच्याकडून आर्थिक क्षेत्राचे लोकशाहीकरण; भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचे वक्तव्य

भारतात येणाऱ्या पहिल्या पिढीतील लक्षाधीश आणि अब्जाधीशांची संख्या गेल्या सत्तर वर्षांतील कोणत्याही वेळेपेक्षा जास्त आहे
पंतप्रधान मोदी यांच्याकडून आर्थिक क्षेत्राचे लोकशाहीकरण; भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचे वक्तव्य

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध युद्धच केले नाही, तर गेल्या दहा वर्षांत देशाच्या आर्थिक क्षेत्राचे लोकशाहीकरणही केले आहे, असे उद्गार बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार व भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी एका मुलाखतीत सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘वंशज’ संबोधून भारतीय सूर्या म्हणाले की, राहुल गांधी आज जे काही आहेत, ते केवळ त्यांना त्यांच्या पालकांचा तसेच कुटुंबाचा आर्थिक, राजकीय वारसा मिळाला आहे, त्यामुळे आहेत. राहुल गांधींसारखी व्यक्ती ही देशाच्या अर्थव्यवस्थेकडे हक्काच्या दृष्टीकोनातून तसेच घराणेशाहीच्या दृष्टीकोनातूनच पाहू शकते.

पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षांत त्यांनी देशाच्या आर्थिक क्षेत्राचे लोकशाहीकरण केले आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेला औपचारिक करण्यासाठी सरकारने केलेल्या बहुआयामी प्रयत्नांमुळे आपण त्यांना धन्यवाद देतो, असेही सूर्या यांनी सांगितले.

आज भारतात पहिल्या पिढीतील अब्जाधीश सापडू शकतात ज्यांना व्यवसायाचा वारसा नाही. परंतु, राहुल गांधी यांना त्यांच्या पालकांचा, कुटुंबाचा आर्थिक वारसा मिळाला आहे. राजकीय वारसा म्हणून, ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे लोकशाहीकरण स्वीकारण्यास आणि ओळखण्यास तयार नाहीत.

भारतात येणाऱ्या पहिल्या पिढीतील लक्षाधीश आणि अब्जाधीशांची संख्या गेल्या सत्तर वर्षांतील कोणत्याही वेळेपेक्षा जास्त आहे, असे सूर्या म्हणाले. हा देश आणि देशाचे सरकार एक किंवा दोन पिढीतील उद्योजकांना पाठिंबा देत आहे, असा मूर्खपणाचा आरोप तुम्ही कसा लावू शकता?, कोणीही या सरकारवर क्रॉनी भांडवलशाहीचा आरोप कसा लावू शकतो, असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in