Red Fort Blast : दिल्ली स्फोटातील दहशतवादी उमरचे घर स्फोटाद्वारे उडवले

सुरक्षा दलांनी पुलवामा येथील दहशतवादी डॉ. उमर नबीचे घर गुरुवारी रात्री आयईडी स्फोटाद्वारे उडवून दिले. ‘डीएनए मॅचिंग’मुळे उमर हाच स्फोट झालेल्या कारमध्ये असल्याची पुष्टी झाली आहे.
Red Fort Blast : दिल्ली स्फोटातील दहशतवादी उमरचे घर स्फोटाद्वारे उडवले
Published on

नवी दिल्ली : सुरक्षा दलांनी पुलवामा येथील दहशतवादी डॉ. उमर नबीचे घर गुरुवारी रात्री आयईडी स्फोटाद्वारे उडवून दिले. ‘डीएनए मॅचिंग’मुळे उमर हाच स्फोट झालेल्या कारमध्ये असल्याची पुष्टी झाली आहे. उमर पुलवामाच्या कोइल भागात राहत होता. पोलिसांनी त्याचे पालक आणि भावांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

दिल्ली स्फोटाचा संबंध आता हरयाणाच्या नूह (मेवात) जिल्ह्यातील पिंगवन भागाशी जोडला गेला आहे. तपास यंत्रणेने खत विक्रेता दिनेश सिंगला उर्फ ​​डब्बू याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. डब्बूने अल-फलाह विद्यापीठातील डॉ. मुझम्मिल शकील याला अमोनियम नायट्रेट पुरवल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे डब्बूकडे अमोनियम नायट्रेट बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता. याच अमोनियम नायट्रेटचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी करण्यात आला होता.

आतापर्यंत अटक केलेल्या आठ दहशतवाद्यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या वर्धापनदिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी स्फोट घडवण्याचा त्यांचा हेतू असल्याचे सांगितले.

दरम्यान, दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसने कानपूर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आरिफला अटक केली आहे. त्याचे संबंध मृत दहशतवादी डॉ. उमर आणि त्याची महिला सहकारी डॉ. शाहीन यांच्याशी असल्याचे आढळून आले आहे. आरिफ दोन्ही व्यक्तींच्या संपर्कात होता. तपासात असेही समोर आले आहे की शाहीन आणि आरिफ दररोज बोलत होते.

logo
marathi.freepressjournal.in