दिल्लीत दाट धुक्याची चादर, 110 विमाने, 25 रेल्वेगाड्यांना फटका;  हवामान खात्याकडून 'अलर्ट' जारी  

धुक्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तसेच लँडिंग करणाऱ्या जवळपास 110 विमानांना विलंब झाला
दिल्लीत दाट धुक्याची चादर, 110 विमाने, 25 रेल्वेगाड्यांना फटका;  हवामान खात्याकडून 'अलर्ट' जारी

 
Published on

दिल्ली-एनसीआर आज सकाळपासून धुक्याची चादर पसरली. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने त्याचा परिणाम रेल्वे आणि विमानसेवेवर झाल्याचे दिसून आले. यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तसेच लँडिंग करणाऱ्या जवळपास 110  विमानांना विलंब झाला. दृश्यमानता कमी असल्याने जवळपास 18 विमानांच्या उड्डाणाला जास्त वेळ लागला. शिवाय, वेगवेगळ्या ठिकाणांहून येणारी 8 विमाने इतर ठिकाणी वळण्यात आली. तसेच, यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या २५ रेल्वे गाड्यांना देखील विलंब झाला. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने आज (बुधवारी) ऑरेंज अलर्ट आणि गुरुवारी येलो अलर्ट जारी केला आहे.

दाट धुके असल्याने विमान सेवेच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल करण्यात आला. धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने अजूनही विमानांच्या उड्डाणाला विलंब होत आहे. आज सकाळी दृष्यमानता कमी झाल्यामुळे पटना, अहमदाबाद, पुणे जयपूर आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये जाणाऱ्या विमानसेवेला याचा फटका बसला. पटनाला जाणारे विमान यामुळे 5 तास उशिरा पोहचले. तर, अमहमदाबादहून उड्डाण करणाऱ्या विमानाला 8 तासांचा विलंब झाला.

पुढील तीन दिवस धुक्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दिल्लीत पुढील तीन दिवस धुके कायम राहणार आहे. मंगळवारी देखील दृश्यमानता 50 मीटरपर्यंत कमी झाली होती. AQI  गंभीर स्थितीत असल्याने दिल्लीकरणांना श्वास घेणे देखील अच़डणीचे ठरत होते. तसेच, आज तापमान कमित कमी 7 तर जास्तित जास्त 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in