‘नीट’ पेपरफुटीशी तेजस्वी यांचा संबंध, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा

'नीट' पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांशी लागेबांधे होते, असा दावा बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी गुरुवारी केला आणि याबाबत तपासाची मागणी केली.
‘नीट’ पेपरफुटीशी तेजस्वी यांचा संबंध, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा
स्क्रीनशॉट, एक्स @NCMIndiaa
Published on

पाटणा : 'नीट' पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांशी लागेबांधे होते, असा दावा बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी गुरुवारी केला आणि याबाबत तपासाची मागणी केली.

या प्रकरणीतील मुख्य आरोपीचे नाव सिकंदर प्रसाद यदवेंदू असे असून अधिकारी त्याच्याशी सातत्याने संपर्कात होते, असा दावाही सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत केला. तेजस्वी यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी पाटणा अतिथीगृह आणि अन्य ठिकाणी सिकंदर याच्या वास्तव्याची व्यवस्था केली होती. सिकंदर याच्या वास्तव्याची व्यवस्था करण्याबाबत ज्या अधिकाऱ्यांना संदेश पाठिवण्यात आले त्याचा सविस्तर तपशील आपल्याकडे आहे, असेही सिन्हा म्हणाले.

ज्या भ्रमणध्वनीवरून हे संदेश पाठविण्यात आले त्याचे क्रमांकही आपल्याकडे आहेत. त्यामुळे याची सविस्तर चौकशी होणे गरजेचे आहे. तेजस्वी यादव यांनी याबाबत मौन का पाळले आहे, मुख्य आरोपीचे राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (रांची कारागृहात असताना) यांच्याशीही संबंध होते हे सुचविणारे अहवालही आहेत, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in