नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केले, दिल्ली सरकारचे कौतुक

दिल्ली सरकारने एक लाखाहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दिल्ली आरोग्यकोष योजनेमधून पाच लाख नागरिकांना मोफत उपचार मिळू शकले आहेत.
नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केले, दिल्ली सरकारचे कौतुक
Published on

नवी दिल्ली : दिल्लीत गुरुवारी विधानसभेत केलेल्या भाषणात आप सरकारच्या कामावर नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी प्रकाश टाकून कौतुक केले.

दिल्ली सरकारने एक लाखाहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दिल्ली आरोग्यकोष योजनेमधून पाच लाख नागरिकांना मोफत उपचार मिळू शकले आहेत. तसेच १६५० विद्युत बसची भर, २०२३ मध्ये वीजेची सर्वोच्च मागणी व ती ७४३८ पर्यंत वाढली शून्य लोडशेडिंग यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले, अशा कामांची नायब राज्यपाल सक्सेना यांनी दखल घेतली. ते म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत विजेचे दर वाढवले गेले नाहीत आणि वीज दर सर्व शेजारील राज्यांपेक्षा सर्वात कमी आहेत.

यावेळी अरविंद केजरीवाल सरकारवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना भाजप आमदारांनी त्यांच्या भाषणादरम्यान त्यांना अनेक वेळा अडथळा आणला. त्या वेळी सक्सेना म्हणाले की, लोकांनी दिलेला विश्वास आणि दिल्लीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी सरकार समर्पण आणि प्रामाणिकपणाने काम करत आहे. उपराज्यपालांचे विधानसभेतील प्रथेचे भाषण तत्कालीन सरकारचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करते.

सक्सेना म्हणाले, मला विश्वास वाटतो की, या आदरणीय सभागृहाच्या सदस्यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने आम्ही आगामी आव्हानांवर मात करू आणि दिल्लीला आधुनिक, प्रगतिशील शहर बनविण्यास प्रयत्न करू.

logo
marathi.freepressjournal.in