
गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरु असून चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनी दावा केला होता की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी दिल्लीमध्ये हालचाली सुरु आहेत. अशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३ दिवसांची सुट्टी घेऊन गावी गेल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांना टोला मारत या चर्चांवर आपले मत व्यक्त केले.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, "तुम्ही संजय राऊतांना भेटलात वाटते?" असे उत्तर दिले. तसेच, यावेळी त्यांना नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करणे एक बॅनर झळकले. याबाबत ते म्हणाले की, "जेणे कोणी हे बॅनर लावले असेल, त्याने ते काढून टाकावे. असतात काही अतिउत्साही लोकं, तेच असे काहीतरी करतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेतच, शिवाय २०२४ मध्ये तेच मुख्यमंत्री होणार आहेत. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात विधानसभेच्या निवडणुका लढवू." असे स्पष्ट केले.