Iran vs US-Israel War : जगातील संघर्ष थांबवण्याची मोदींमध्ये क्षमता - देवेंद्र फडणवीस

जगातील संघर्ष थांबविण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे आणि अमेरिकेचे नेतेही तेच सांगत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.
जगातील संघर्ष थांबवण्याची मोदींमध्ये क्षमता - देवेंद्र फडणवीस
जगातील संघर्ष थांबवण्याची मोदींमध्ये क्षमता - देवेंद्र फडणवीस
Published on

नागपूर : जगातील संघर्ष थांबविण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आहे आणि अमेरिकेचे नेतेही तेच सांगत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. भारताची जहाजे होमुझे सामुद्रधुनीतून भारतात येत आहेत याचा आनंद आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता या गोष्टींवर केंद्र सरकार अधिकृतरीत्या मत व्यक्त करेल. मात्र, जे मोदींच्या क्षमतेवर शंका व्यक्त करत होते, त्यांना मोदींनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे, असे म्हणत फडणवीसांनी इराणच्या भूमिकेचे स्वागत केले. आता अमेरिकेतील नेतेही सांगत आहेत की, आज जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे. त्यामुळे, आपल्या देशातील बडबड आणि फडफड करणाऱ्या नेत्यांनी ही स्थिती समजून घेतली पाहिजे आणि गप्प राहिले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

नवी चाल

जागतिक व्यापाराची जीवनवाहिनी मानली जाणारी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' सध्या जगातील सर्वात धोकादायक ठिकाण बनली आहे. या सागरी मार्गावर इराणने आपले नियंत्रण घट्ट केले असून, अमेरिकेच्या वाढत्या लष्करी लष्करी हालचालींमुळे येथे कधीही मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने अधिकृतपणे हा मार्ग पूर्णपणे बंद केला नसला तरी, त्यांनी एक 'नवी चाल' खेळली आहे. इराण केवळ त्यांच्या अटी मान्य करणाऱ्या आणि मित्रराष्ट्रांच्या जहाजांनाच या मार्गातून जाण्याची परवानगी देत आहे.

भारताने आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर मोठा विजय मिळवल्याचे बोलले जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणसोबत केलेल्या यशस्वी चर्चेनंतर, भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना 'सुरक्षित मार्ग' देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मोदींचे कौतुक केले आहे. अमेरिकेतील नेतेही सांगत आहेत की, आज जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे. त्यामुळे, आपल्या देशातील बडबड आणि फडफड करणाऱ्या नेत्यांनी ही स्थिती समजून घेतली पाहिजे आणि गप्प राहिले पाहिजे, असेही फडणवीसांनी म्हटले.

काँग्रेसचे षडयंत्र

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील इंधन पुरवठा आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. गॅस वितरणाच्या त्रुटीमुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून येते. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केले. गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी होत नाही. तर काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांमध्ये जो पॅनिक तयार केला आहे, त्यामुळे ही गर्दी होत आहे. मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पॅनिक निर्माण करण्याचे षडयंत्र काँग्रेसने केले आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in