DHFL च्या माजी प्रवर्तकांची बँक, डीमॅट खाती जप्त करा; सेबीचे आदेश

गेल्या वर्षी जुलैमध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने त्यांच्यावर लावलेला दंड भरण्यात दोन्ही बंधू अयशस्वी झाल्यानंतर सेबीने वरील कारवाई केली.
DHFL च्या माजी प्रवर्तकांची बँक, डीमॅट 
खाती जप्त करा; सेबीचे आदेश

नवी दिल्ली : बाजार नियामक सेबीने धीरज वाधवन आणि कपिल वाधवन यांची बँक खाती तसेच त्यांच्याकडील शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्प लिमिटेड (डीएचएफएल)चे माजी प्रवर्तकांकडील एकूण २२ लाख रुपयांहून अधिक थकबाकी वसूल करण्यासाठी सेबीने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने त्यांच्यावर लावलेला दंड भरण्यात दोन्ही बंधू अयशस्वी झाल्यानंतर सेबीने वरील कारवाई केली. मंगळवारी जारी केलेल्या दोन वेगवेगळ्या संलग्नक नोटिसांमध्ये, बाजार नियामकाने प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी बँक, डिमॅट खाती आणि म्युच्युअल फंड फोलिओ संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत.

वाधवांकडील प्रत्येकी १०.६ लाख रुपयांच्या थकबाकीमध्ये प्रारंभिक दंडाची रक्कम, व्याज आणि वसुलीचा खर्च समाविष्ट आहे. जुलै २०२३ मध्ये, डीएचएफएल (आता पिरामल फायनान्स म्हणून ओळखले जाते)चे प्रवर्तक असलेल्या वाधवनांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नियामकाने प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. कपिल वाधवन हे डीएचएफएलचे चेअरमन आणि एमडी होते, तर धीरज वाधवन हे कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. हे दोघेही डीएचएफएलच्या संचालक मंडळावर होते.

सेबीने डीएचएफएल प्रमेरिका लाइफ इन्शुरन्स (पूर्वीचे डीएलएफ प्रामेरिका लाइफ इन्शुरन्स) मधील डीएचएफएलचे समभाग त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी डीएचएफएल इन्व्हेस्टमेंट्स आणि इतर संबंधित व्यवहारांकडे हस्तांतरित केल्याचा तपास केल्यानंतर हा आदेश आला. तपास कालावधी फेब्रुवारी-मार्च २०१७ होता. सेबीने इशारा दिला होता की, १५ दिवसात ‘पेमेंट’ न केल्यास त्यांना अटक केली जाईल आणि त्यांची बँक खाती जप्त केले जातील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in