संत तुकारामांबद्दल धीरेंद्र कृष्ण महाराजांचे आक्षेपार्ह विधान; राज्यभरात उमटले पडसाद

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरातून अनेक हिंदू संघटनांनी, नेत्यांनी विरोध केला
संत तुकारामांबद्दल धीरेंद्र कृष्ण महाराजांचे आक्षेपार्ह विधान; राज्यभरात उमटले पडसाद

गेले काही दिवस चमत्कार सिद्ध करण्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी ते राज्यातील थोर संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल म्हणाले की, "महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांना त्यांची बायको रोज काठीने मारत होत्या." असे वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून भाजप अध्यात्मिक संघटनेपासून इतर सर्व हिंदू संघटनानी याला विरोध दर्शविला.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणाले की, "महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांना त्यांची बायको रोज काठीने मारत होत्या. यावेळी त्यांना कोणीतरी विचारले होते की, तुम्हाला पत्नी मारते यावर तुम्हाला काहीच वाटत नाही का? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, देवाची कृपा म्हणून मला मारणारी बायको मिळाली. प्रेम करणारी बायको मिळाली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. बायकोतच अडकलो असतो, पण मारणारी बायको मिळाली आणि मला संधी मिळाली देवावर प्रेम करण्याची," त्यांच्या या विधानावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in