अखेर धीरेंद्र शास्त्रीने संत तुकारामांबद्दलचे वक्तव्य घेतले मागे; म्हणाला...

महाराष्ट्राचे थोर संत तुकाराम यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्रीवर झाली होती टीका
अखेर धीरेंद्र शास्त्रीने संत तुकारामांबद्दलचे वक्तव्य घेतले मागे; म्हणाला...

महाराष्ट्राचे थोर संत तुकाराम यांच्याबद्दल धीरेंद्र महाराज शास्त्रीने वादग्रस्त विधान केले होते. यानंतर आता त्याला उपरती झाली असून अखेर टीकेनंतर त्याने महाराष्ट्राची हात जोडून माफी मागितली. "तुकाराम महाराज हे महान संत आहेत. तेच आपले आदर्श आहेत" असे म्हणत त्याने वारकरी संप्रदायाची माफी मागितली. धीरेंद्र शास्त्रीची तुकाराम महाराजांबद्दल बोलताना, "त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लिन व्हायचे" असे वादग्रस्त विधान केले होते. यानंतर महाराष्ट्रभरातून त्याच्या या विधानावर टीका करण्यात आली.

धीरेंद्र शास्त्रीने केलेल्या या विधानावर महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदाय नाराज झाला. तसेच, भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले म्हणाले होते की, "शिरेंद्र महाराजांच्या विधानामुळे फक्त वारकरी संप्रदायाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी" अशी मागणी केली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका करताना म्हंटले होते की, "ज्याने कधी लग्न केले नाही, त्याला संसार काय कळणार? असा अपमान करणाऱ्यांने माफी मागावी नाहीतर टाळकी दुरुस्त करावी लागतील." असा इशारा त्यांनी दिला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in