मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. जंतर-मंतरवरील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.
मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
Published on: 

नवी दिल्ली : प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठीला आज (दि. १०) सकाळी सुमारे ७.४५ वाजता दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील सेंट्रल पार्क विहार परिसरातील त्याच्या राहत्या घरातून ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली असून, राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

'आंदोलनाला गर्दी होणार नसेल, तर एवढे निर्बंध कशासाठी?'

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मेट्रो स्थानके बंद ठेवणे, रेल्वेगाड्या रद्द करणे, बससेवेवर निर्बंध आणि मध्य दिल्लीतील काही भागांत मोबाइल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यासारख्या उपाययोजना केल्याचा दावा राठीने केला आहे. याआधी त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिल्लीतील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले होते.

"मित्रांनो, मी दिल्लीत आलो आहे. इथे आपल्या पंतप्रधानांनी काय व्यवस्था केली आहे, हे मी पाहिले. ५० हून अधिक मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. रेल्वेगाड्या बंद केल्या आहेत, बसगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आमच्या आंदोलनामुळे दिल्लीला जवळपास लॉकडाऊनच्या स्थितीत आणले जात आहे," असे राठीने व्हिडीओमध्ये म्हटले.

भाजपशी संबंधित सोशल मीडिया खात्यांवर आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याचे दावे केले जात असल्याचा उल्लेख करत राठीने सरकारच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला. "एका बाजूला तुमच्या आयटी सेलमधील लोक म्हणत आहेत की आमच्या आंदोलनाला कोणीही येणार नाही. जर गर्दी होणारच नसेल, तर मग एवढे निर्बंध का लादले जात आहेत? हे मला समजत नाही," असे तो म्हणाला.

मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
CJP Protest : अभिजीत दिपकेंसह सीजेपीच्या कार्यकर्त्यांना विमानातच घेतले ताब्यात; आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

"मला वाटते की तुम्ही खरोखरच घाबरला आहात. देशातील संपूर्ण जनता जागी झाली आहे," असा दावाही राठीने केला. तसेच, १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्याने नागरिकांना केले.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने हे आंदोलन पुकारले आहे. मात्र, आंदोलनापूर्वी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था आणि सार्वजनिक वाहतुकीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांवरून वाद निर्माण झाला असून, या उपाययोजनांवरही राठीने प्रश्न उपस्थित केले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)