मधुमेह आणि कॅन्सरची औषधे स्वस्त होणार, केंद्र सरकार १५ ऑगस्टला घोषणा करण्याची शक्यता

केंद्र सरकारकडून औषधांच्या किमती कमी करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही
मधुमेह आणि कॅन्सरची औषधे स्वस्त होणार, केंद्र सरकार १५ ऑगस्टला घोषणा करण्याची शक्यता

केंद्र सरकारने मधुमेह आणि कॅन्सरच्या औषधांवरील किमती कमी करण्याचे निश्चित केल्याने देशातील डायबेटिस आणि कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या १५ ऑगस्टला केंद्र सरकारकडून याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे डायबेटिस, कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी मदत होणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारकडून औषधांच्या किमती कमी करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. सरकारकडून याबाबत काही प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यावरील प्रस्तावावर सरकारकडून शिक्कामोर्बत झाल्यावर घोषणा करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

गंभीर आणि दुर्मीळ आजारांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या किमती खूप जास्त आहेत. याचा फटका उपचार घेणाऱ्या रुग्णांना बसतो. यामुळे याबाबत सरकारकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे या औषधांच्या किमती कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर औषधांच्या किमती किमान ७० टक्क्यांपर्यंत कमी होतील. अत्यावश्यक औषधांच्या यादीचा म्हणजेच नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शिअल मेडिसिन २०१५चा फेरआढावाही सरकार घेणार आहे. आता सध्या ज्या औषधांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय, त्यांचाही विचार केला जाणार आहे. याशिवाय रुग्णाच्या दीर्घ आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या किमतीवरील फायदा कमी करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in