डिझेल निर्यातीत जुलैमध्ये तब्बल ११ टक्के घट

विंडफॉल टॅक्स लावल्याने निर्यातीत घट झाल्याचे अधिकृत आकडेवारीवरुन दिसते.
डिझेल निर्यातीत जुलैमध्ये तब्बल ११ टक्के घट
Published on

भारताच्या डिझेल निर्यातीत जुलैमध्ये तब्बल ११ टक्के घट झाली आहे. तसेच विदेशात पाठवण्यात येणाऱ्या पेट्रोलमध्ये ४.५ टक्के घसरण झाली आहे. सरकारने पुन्हा निर्यातीवरील नफ्यावर कर अर्थात विंडफॉल टॅक्स लावल्याने निर्यातीत घट झाल्याचे अधिकृत आकडेवारीवरुन दिसते.

डिझेलच्या निर्यातीत जुलैमध्ये २.१८ दशलक्ष टन घट होऊन २.४५ दशलक्ष टन झाली, अशी माहिती तेल मंत्रालयाने पेट्रोलियम प्लॅनिंग ॲण्ड ॲनालिसिस सेल (पीपीएसी)ने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन दिसून येते. अशाच प्रकारे पेट्रोलच्या निर्यातीत १.१ दशलक्ष टन घसरुन होऊन जूनमध्ये १.१६ दशलक्ष टन झाली.

logo
marathi.freepressjournal.in