प्रत्यक्ष कर संकलन १५. ६० लाख कोटींवर आर्थिक वर्षाच्या सुधारित

१ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सुधारित अंदाजात प्रत्यक्ष करसंकलनाचा अंदाज १८.४३ लाख कोटींवरून १९.४५ लाख कोटी करण्यात आला आहे.
प्रत्यक्ष कर संकलन १५. ६० लाख कोटींवर आर्थिक वर्षाच्या सुधारित

वृत्तसंस्था/नवी दिल्ली : प्रत्यक्ष कर संकलनाच्या ताज्या आकडेवारीत वाढ झाली असून १० फेब्रुवारी २०२४ पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन तब्बल १५.६० लाख कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा ते १७.३० टक्के जास्त आहे, असे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने एका निवेदनात म्हटले आहे.

१ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सुधारित अंदाजात प्रत्यक्ष करसंकलनाचा अंदाज १८.४३ लाख कोटींवरून १९.४५ लाख कोटी करण्यात आला आहे. तर आर्थिक वर्ष २४ च्या १० फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन, रिफंडच्या निव्वळ १५.६० लाख कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा २०.२५ टक्के जास्त आहे.

हे संकलन २०२३-२४ च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण सुधारित अंदाजाच्या ८०.२३ टक्के आहे. १ एप्रिल २०२३ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत २.७७ लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे.

कॉर्पोरेट आयकर (सीआयटी) आणि वैयक्तिक आयकर (पीआयटी) साठी एकूण महसूल संकलनातही स्थिर वाढ दिसून आली. सीआयटीसाठी वाढीचा दर ९.१६ टक्के होता तर पीआयटीसाठी तो २५.६७ टक्के होता. परताव्याच्या समायोजनानंतर सीआयटी संकलनामध्ये निव्वळ वाढ १३.५७ टक्के होती आणि पीआयटीमध्ये २६.९१ टक्के वाढ झाली, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in