दिग्दर्शक राजकुमार संतोषींना दोन वर्षांचा तुरुंगवास; जामनगर न्यायालयाने सुनावली शिक्षा

राजकुमार संतोषी यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावत असताना चेकच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून जमा करण्याचेही आदेश दिले आहेत.
दिग्दर्शक राजकुमार संतोषींना दोन वर्षांचा तुरुंगवास; जामनगर न्यायालयाने सुनावली शिक्षा

अहमदाबाद : ‘घायल’, ‘घातक’ या चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जामनगर न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. राजकुमार संतोषी यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावत असताना चेकच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून जमा करण्याचेही आदेश दिले आहेत.

संतोषी यांनी जामनगरचे व्यावसायिक अशोकलाल यांच्याकडून १ कोटी रुपये घेतले होते. मात्र ते पैसे परतच केले नाहीत. यानंतर अशोकलाल हे राजकुमार संतोषींच्या विरोधात न्यायालयात गेले. ज्यानंतर जामनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. राजकुमार संतोषी यांचे चेक बाऊन्सचे हे प्रकरण २०१५ मधील आहे. २०१९ मध्ये राजकुमार संतोषी न्यायालयात हजर झाले होते. राजकुमार संतोषी आणि अशोकलाल हे चांगले मित्र आहेत. २०१५ मध्ये संतोषी यांनी अशोकलाल यांच्याकडून १ कोटी रुपये घेतले. ही रक्कम परत करताना संतोषी यांनी अशोकलाल यांना १० लाखांचे १० चेक दिले होते. पण २०१६ मध्ये हे चेक बाऊन्स झाले, असे अशोकलाल यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते.

logo
marathi.freepressjournal.in