भारतीय बनावटीच्या ग्रीन हायड्रोजन वाहनांवर चर्चा; मोदींनी प्रमुख जागतिक कंपन्यांच्या सीईओंची घेतली भेट

मायक्रोन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि सीईओ संजय मेहरोत्रा यांनी गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेतली.
भारतीय बनावटीच्या ग्रीन हायड्रोजन वाहनांवर चर्चा; मोदींनी प्रमुख जागतिक कंपन्यांच्या सीईओंची घेतली भेट

वृत्तसंस्था/गांधीनगर : खासगी कंपन्यांनी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करावी. तसेच अर्थव्यवस्थेला चालना द्या आणि रोजगार निर्माण करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मंगळवारी ‘व्हायब्रंट गुजरात समिट’च्या बाजूला काही प्रमुख जागतिक कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. सीईओंशी झालेल्या बैठकीत ग्रीन हायड्रोजनवर भारतात बनवलेल्या वाहनांवर चर्चा झाली.

१० ते १२ जानेवारी दरम्यान, व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट येथे होणार आहे. त्याचे उद्घाटन करण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधानांनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन, मायक्रोन टेक्नॉलॉजी आणि एपी मोलरच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि उद्योग समस्या आणि गुंतवणूकीच्या संधींवर चर्चा केली.

मोदी आणि तोशिहिरो सुझुकी, प्रतिनिधी संचालक आणि अध्यक्ष, सुझुकी मोटर कॉर्प यांच्यातही चर्चा झाली. यावेळी ‘मेड इन इंडिया’ वाहनांची निर्यात करून, वाहन स्क्रॅपिंग आणि वाहन पुनर्वापराशी संबंधित जागतिक सर्वोत्तम पद्धती लागू करून जागतिक ऑटोमोटिव्ह बाजारपेठेत भारताला एक मजबूत देश बनवण्याच्या मारुती सुझुकीच्या योजनांवर चर्चा झाली. मारुती सुझुकी गुजरातमध्ये दुसरा कार निर्मिती कारखाना उभारण्याच्या विचारात आहे. कंपनीचा देशातील हा पाचवा कारखाना असेल. पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली.

पंतप्रधानांनी डीपी वर्ल्डचे ग्रुप चेअरमन आणि सीईओ अहमद बिन सुलेम यांचीही भेट घेतली. त्यांनी भारतातील गुंतवणुकीला अधिक चालना देण्यासाठी डीपी वर्ल्डच्या योजनांवर- विशेषत: शाश्वत, हरित आणि ऊर्जा-कार्यक्षम बंदरे आणि जागतिक दर्जाची शाश्वत लॉजिस्टिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याशी संबंधित चर्चा केली, असे पीएमओने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे. डीपी वर्ल्डने गेल्या वर्षी दीनदयाल बंदर प्राधिकरणासोबत गुजरातमधील कांडला येथे नवीन २.१९ दशलक्ष टीईयू प्रतिवर्ष मेगा-कंटेनर टर्मिनल विकसित करण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी सवलत करार केला होता. दुबईस्थित लॉजिस्टिक कंपनी सध्या भारतात पाच कंटेनर टर्मिनल चालवते- दोन मुंबईत, प्रत्येकी एक मुंद्रा, कोचीन आणि चेन्नईत. त्यांची एकत्रित क्षमता अंदाजे ६ दशलक्ष टीईयू आहे. मोदींनी एपी मोलरचे सीईओ कीथ स्वेंडसेन यांचीही भेट घेतली.

मायक्रोन टेक्नॉलॉजी अध्यक्षांशी चर्चा

मायक्रोन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि सीईओ संजय मेहरोत्रा यांनी गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांनी भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन वाढवण्यासाठी मायक्रोनच्या प्रयत्नांवर चर्चा केली, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ)ने ‘एक्स’वर एका वेगळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यूएस चिप बनवणाऱ्या मायक्रॉनने अहमदाबादपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या साणंदमध्ये २.७५ अब्ज अमेरिकन डॉलर्स सेमीकंडक्टर कारखान्याचे बांधकाम सुरू केले आहे. वेफ्टर्सचे बॉल-ग्रिड ॲरे (BGA) इंटिग्रेटेड सर्किट पॅकेजेस, मेमरी मॉड्यूल्स आणि सॉलिड-स्टेट ड्राइव्हमध्ये रूपांतरित करण्यावर लक्ष केंद्रित करणारा प्लांट या वर्षी डिसेंबरपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in