सुप्रसिद्ध डिस्नी कंपनीत मोठी नोकरकपात; तब्बल ४ हजार जणांची नोकरी जाण्याची शक्यता

डिस्नी कंपनी ही मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून या कंपनीमध्ये तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांना पदमुक्त करण्याची शक्यता
सुप्रसिद्ध डिस्नी कंपनीत मोठी नोकरकपात; तब्बल ४ हजार जणांची नोकरी जाण्याची शक्यता
Published on

जागतिक मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी डिस्नीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं माहिती देण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात ४ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे. यामुळे जागतिक मंदीचा फटका याही कंपनीला बसला असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिस्नीने कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी, तसेच खर्च कमी करण्यासाठी हे पॉल उचलणार असल्याचे सांगितले जात आहे.

डिस्नी कंपनी ही अनेक क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये या कंपनीचा मोठा दबदबा आहे. त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. यापूर्वीही कंपनीने तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. दरम्यान, डिस्नी कंपनी चित्रपट निर्मिती, अ‍ॅनिमेशन चित्रपटाची निर्मिती तसेच डिस्नी प्लस म्हणून एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिज्नीने सुमारे ४ हजार कर्मचारी कमी करण्याची योजना आखली असून बजेट कमी करण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या व्यवस्थापकांना एप्रिलमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरकपातीसाठी उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यास सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in