नीट परीक्षेविरोधात द्रमुकचे उपोषण

नीट परीक्षेविरोधात द्रमुकचे उपोषण

- परीक्षा रद्द झाल्याशिवाय थांबणार नाही : स्टालिन

चेन्नई : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नॅशनल एन्ट्रन्स-कम-इलिजिबिलिटी टेस्ट (नीट) या परीक्षेतून राज्याला सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाच्या नेत्यांनी रविवारी एक दिवसीय उपोषण केले. केंद्र सरकारने तामिळनाडूत नीट परीक्षा रद्द केल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचे द्रमुक नेते उदयनिधी स्टालिन यांनी म्हटले आहे.

नीट परीक्षेत उत्तीर्ण होण्यात अपयश आल्याने तामिळनाडूत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. रविवारी या सर्वांना आदरांजली वाहत द्रमुकने राज्यभरात एक दिवसाचे उपोषण केले. केंद्र सरकार राज्यात नीट परीक्षा रद्द करत नसल्याबद्दल द्रमुकच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच परीक्षा रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचे उदयनिधी स्टालिन यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in