नेपाळी नागरिकांना सैन्यात भरती करू नका! रशियाला नेपाळची विनंती

नेपाळी नागरिकांना रशियन सैन्यात प्रवेश देऊ नये आणि जे आधीच युक्रेनमधील युद्ध लढण्यासाठी देशाच्या सैन्यात सामील झाले आहेत त्यांना परत आणण्यास मदत करावी, असे आवाहन नेपाळने रशियाला केले आहे.
नेपाळी नागरिकांना सैन्यात भरती करू नका! रशियाला नेपाळची विनंती

काठमांडू : नेपाळी नागरिकांना रशियन सैन्यात प्रवेश देऊ नये आणि जे आधीच युक्रेनमधील युद्ध लढण्यासाठी देशाच्या सैन्यात सामील झाले आहेत त्यांना परत आणण्यास मदत करावी, असे आवाहन नेपाळने रशियाला केले आहे.

किमान २०० नेपाळी तरुण बेकायदेशीर मार्गाने रशियन सैन्यात सामील झाले आहेत आणि त्यापैकी १२ जणांनी युक्रेनविरुद्ध लढताना आपला जीव गमावला आहे. नेपाळचे परराष्ट्र मंत्री एन. पी. सौद यांनी शुक्रवारी रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री वर्शिनिन सर्गेई वासिलीविच यांच्याशी युगांडामधील कंपाला येथे सुरू असलेल्या अलाइनड समिटच्या निमित्ताने भेट घेतली. त्यावेळी त्यांनी रशियाला हे आवाहन केले, अशी माहिती सौदच्या खासगी सचिवालयाने दिली आहे.

सौद यांनी स्पष्ट केले की, नेपाळकडे आपल्या नागरिकांना परकीय सैन्यात पाठवण्याचे कोणतेही धोरण नाही. म्हणूनच, मी रशियन मंत्र्याला आमच्या नागरिकांची सैन्यात भरती करू नये असे सांगितले आहे, असे सौद यांच्या वैयक्तिक सचिवालयाने स्पष्ट केले. सौदन यांनी रशियन बाजूने लढताना रशिया-युक्रेन युद्धात मारले गेलेल्यांचे मृतदेह परत पाठवावे आणि पीडितांच्या कुटुंबाला भरपाई द्यावी, अशीही मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in