झोप पूर्ण होऊनही झोप न झाल्यासारखं वाटतं? तर 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

प्रत्येक वेळी जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात काहीतरी कमतरता असल्याचे हे संकेत आहेत.
झोप पूर्ण होऊनही झोप न झाल्यासारखं वाटतं? तर 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

तुमची झोप पूर्ण होत नाही का? किंवा 8-9 तासांची झोप झाल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवतो ? चेहेरा अपुर्ण झोप झाल्यासारखा दिसतो. यामागे नेमके काय कारण आहे? कारण शरीरात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता असल्याशिवाय तुम्हाला झोपून उठल्यानंतरही थकवा जाणवत राहणार. रोगप्रतिकारक शक्ती जर उत्तम ठेवायची असले तर रात्रीची शांत झोप आवश्यक आहे.

प्रत्येक वेळी जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात काहीतरी कमतरता असल्याचे हे संकेत आहेत. रक्त आणि ऑक्सिजनची कमरता दिसते. तसेच काही न्युट्रिशन्स सुद्धा तुमच्या शरीराला मिळणे आवश्यक असते. त्याचसोबत ब्लड प्रेशर कमी झाले किंवा वाढल्यास व्यक्तिला थकवा जाणवतो. तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन बीपी, थायरॉइड आणि शुगर तपासून घ्या. तर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर पुढील काही गोष्टींवर लक्ष द्या.

- तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये व्यायामाचा समावेश करा. त्याचसोबत योग्य न्युट्रिशन्स सुद्धा घ्या.

- सातत्याने ही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- रुटीन चेकअप करत रहा. बोन डेंसिटी, विटामिन बी-12, डी आणि हिमग्लोबीनच्या कमतरतेसंदर्भात जागृक रहा.

- सकाळच्या कोवळ्या उन्हात 10 मिनीटे चला.

हे करणे टाळा-

फोन आणि लॅपटॉपचा वापर- फोन आणि लॅपटॉपचा वापर खूप वाढल्याने पुरेशी झोप न होणे डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. जर तुम्हाला या समस्या जाणवत असतील तर ही तुमच्या अपुऱ्या झोपेचे कारणं असू शकतं त्यामुळे फोन आणि लॅपटॉपचा वापर कमी करा.

चहा किंवा कॉफी प्रमाण- दिवसभरात चहा आणि कॉफी जास्त घेतल्याने भुकमोड होते. आणि झोपेचं वेळपत्रक ही बिघडतं. पुरेशी झोप न झाल्यामुळे अनेकजण जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेतात. यांच्या अतिसेवनाने सुद्धा अनेकांच्या झोपेचं रुटीन बदलू शकतं.

जंक फूड खाण्याची सवय- अलिकडे झटपट तयार होणाऱ्या पदार्थांना प्राधान्य दिलं जातं. असे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. जंक फूड खाण्यामुळे पुरेशा पोषक तत्त्वचा मेंदूला पुरवठा होत नाही. शांत झोपायचं असेल तर सतत जंक फूड खाणं टाळावं.

ताणतणाव- एखादी व्यक्ती जर सतत ताण तणावात असेल तर त्याचा स्वभाव चिडचिडा होतो. रात्रीची झोप पूर्ण झाली नाही तर ही लक्षणं त्याच्या स्वभावात दिसून येतात. ताणतणाव निर्णान करणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा.

-सततचा ताण दूर करण्यासाठी नियमित ध्यान-योगा करायला हवा. रात्री शतपावली आणि पहाटे उठून फिरायला जाण्यानेसुद्धा फरक पडतो.

logo
marathi.freepressjournal.in