फक्त दोन रुपये फी घेणाऱ्या डॉक्टरचे निधन; ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केरळमधील कन्नूर येथे गेल्या पाच दशकांपासून फक्त दोन रुपये फी आकारून कोट्यवधी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर एके रायरू गोपाल यांचे रविवारी सकाळी वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
फक्त दोन रुपये फी घेणाऱ्या डॉक्टरचे निधन; ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Photo : X (@np_nationpress)
Published on

कन्नूर (केरळ) : केरळमधील कन्नूर येथे गेल्या पाच दशकांपासून फक्त दोन रुपये फी आकारून कोट्यवधी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर एके रायरू गोपाल यांचे रविवारी सकाळी वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

आपल्याच ‘लक्ष्मी’ या राहत्या निवासस्थानी पहाटे चार ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत ते रुग्णांवर उपचार करायचे. फक्त दोन रुपये फी आकारणाऱ्या त्यांच्या या कामगिरीमुळे ‘दो रुपयेवाले डॉक्टर’, ‘जनतेचा डॉक्टर’ अशी त्यांची ओळख बनली होती. दररोज शेकडो रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी यायचे. विशेष म्हणजे, ज्या रुग्णांकडे औषध खरेदी करण्यासाठी पैसे नसायचे, त्यांना औषधेही हेच डॉक्टर देत असत.

‘लक्ष्मी निवास’ या त्यांच्या घरीच डॉक्टर गोपाल यांनी दवाखाना उघडला होता. वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे अखेरच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी पहाटे चारऐवजी सहा वाजता दवाखाना सुरू केला. मे २०२४ मध्ये खूपच आजारी पडल्याने दवाखाना बंद करावा लागला होता. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी डॉक्टर गोपाल यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in