भारतातील गुंतवणुकीच्या सर्वोत्तम संधी गमावू नका; पीयूष गोयल यांचे अमेरिकन उद्योगपतींना आवाहन

भारतातील गुंतवणुकीच्या सर्वोत्तम संधी गमावू नका; पीयूष गोयल यांचे अमेरिकन उद्योगपतींना आवाहन

भारत-अमेरिका संबंधांमधून स्पर्धात्मक फायदे मिळणे बाकी आहे.

भारत हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम ठिकाण असल्याचे वर्णन करताना वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत आणि अमेरिकेने परस्परांचे हितजपण्याची वेळ आली आहे. भारतातील गुंतवणुकीच्या संधी अमेरिकन उद्योगपतींनी गमावू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) ला संबोधित करताना वरील आवाहन केले.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अमेरिका आणि भारतातील उद्योग प्रतिनिधींना संबोधित करताना केंद्रीय मंत्री सोमवारी अमेरिकेत म्हणाले की दोन्ही देश जागतिक सुरक्षा, स्थिरता आणि लवचिक पुरवठा साखळीत योगदान देऊ शकतात.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले की, भारत-अमेरिका संबंधांमधून स्पर्धात्मक फायदे मिळणे बाकी आहे. भारताने अमेरिकेला पुरवठा साखळी आणि तरुण प्रतिभांची लवचिकता प्रदान केली आहे, तर अमेरिकेने भारताला गुंतवणूक प्रदान केली आहे. या भागीदारी उत्तम व्यावसायिक प्रकरणांसाठी करतात.

जगातील चलनवाढीच्या आजच्या अस्थिर परिस्थितीचा उल्लेख करत मंत्री म्हणाले की, भारत हे गुंतवणुकीसाठी सर्वात पसंतीच्या ठिकाणांपैकी एक आहे आणि आज भारत जगाचा सर्वात पसंतीचा भागीदार आहे. जगभरातील नेते आज द्विपक्षीय करारांच्या माध्यमातून भारताबरोबरचे संबंध आणि व्यापार वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिरातींबरोबरचे भारताचे दोन मुक्त व्यापार करार (एफटीए) यशस्वी ठरले आहेत तसेच युनायटेड किंगडम बरोबरच्या वाटाघाटी पुढील टप्प्यावर आहेत आणि दिवाळीपर्यंत त्या पूर्ण होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

भारतातील सनदी लेखापाल कंपन्यांनी जागतिक भागीदारी विकसित करावी

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जगभरातील भारतीय सनदी लेखापालांना आवाहन केले की, त्यांनी ब्रँड इंडियाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हावे. ते मंगळवारी सॅन फ्रान्सिस्को येथे अमेरिकेतील ६ क्षेत्रांमध्ये इन्सि्टट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेच्या उद्धाटन समारंभात बोलत होते. आयसीएआयच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यवसायाची प्रगती करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल गोयल यांनी त्यांचे अभिनंदन केले.

११८ वर्षांनंतर प्रथमच नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबईत होणाऱ्या २१व्या जागतिक सनदी लेखापाल काँग्रेसचा संदर्भ देत गोयल म्हणाले, भारताच्या G२० अध्यक्षपदाच्या कालखंडात याचे आयोजन होण्याचे निश्चित झाले आहे. जगभरातील देशांच्या समुदायात भारताच्या वाढत्या प्रासंगिकतेला मिळाली ही ओळख असल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in