तृणमूलसोबत युतीचे दरवाजे अद्याप खुले ; काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे वक्तव्य

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असतानाही काँग्रेसने रविवारी सांगितले की...
तृणमूलसोबत युतीचे दरवाजे अद्याप खुले ; काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे वक्तव्य

ग्वाल्हेर : तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असतानाही काँग्रेसने रविवारी सांगितले की, आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत युती करण्याचे दरवाजे अद्याप खुले आहेत. पाटणा येथे विरोधकांच्या रॅलीच्या आधी काँग्रेसचे सरचिटणीस आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, ते अजूनही आशावादी आहेत. आम्ही कोणतेही दरवाजे बंद केलेले नाहीत. तृणमूलने एकतर्फी घोषणा केली आहे की ते पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागा लढवणार आहेत. आमच्या युतीसंबंधात चर्चा सुरू आहे. दरवाजे अजूनही खुले, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in