चेन्नई : भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्यावर शनिवारी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.
त्यांचे पार्थिव एम. एस. स्वामीनाथन संशोधन फाऊंडेशनच्या आवारात ठेवले होते. हजारो नागरिकांनी स्वामीनाथन यांचे शुक्रवारी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली फाऊंडेशनने सांगितले की, चेन्नईच्या बसंत नगर स्मशानभूमीत शनिवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.