डॉ. तात्याराव लहाने दोषी ; परवानगीशिवाय ६९८ शस्त्रक्रिया केल्याचा ठपका

सरकारच्या आदेशाशिवाय त्यांनी ६९८ शस्त्रक्रिया केल्याचे चौकशीत उघड
डॉ. तात्याराव लहाने दोषी ; परवानगीशिवाय ६९८ शस्त्रक्रिया केल्याचा ठपका

जे. जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने दोषी ठरवले आहे. सरकारच्या आदेशाशिवाय त्यांनी ६९८ शस्त्रक्रिया केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतर व राज्य सरकारच्या अंधत्व निवारण मोहिमेंतर्गत समन्वयक म्हणून त्यांनी या शस्त्रक्रिया केल्या आहेत. नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनाही नोटीस पाठवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. डॉ. लहाने यांना कोणत्या आदेशाने शस्त्रक्रिया करण्यास सांगितले, असा खुलासा करण्यास डॉ. पारेख यांना सांगितले आहे. कोणत्याही आदेशाशिवाय डॉ. लहाने यांनी ६९८ शस्त्रक्रिया केल्याचे समितीने दाखवून दिले आहे. या प्रकरणाचा पूर्ण अहवाल अजूनही दाखल केलेला नाही, असे डाक्टरांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. लहाने यांच्या प्रकरणाची आणखी चौकशी करण्याचे आदेश अधिष्ठातांनी दिले आहेत. तसेच गेल्या काही वर्षांत किती डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत, याच्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी जे. जे. रुग्णालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ विभागात सन्माननीय डॉक्टरांच्या मुलाखती घेण्यास प्रारंभ केला आहे.

३ जून रोजी महाराष्ट्र शिक्षण व औषध विभागाने नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यासह माजी अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व अन्य सन्माननीय डॉक्टरांचे राजीनामे स्वीकारले आहेत. तसेच डॉ. लहाने यांना राज्य सरकारच्या अंधत्व निवारण मोहिमेंतर्गत समन्वयक पदावरून हटवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in