Viral Video | दिल्ली मेट्रोत दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी; प्रवाशांना फुकटात बघायला भेटला बॉक्सिंगचा थरार

हा व्हिडिओ अरहंत शेल्बी नावाच्या युजरने X वर पोस्ट केला आहे. नेटकऱ्यांसाठी दिल्ली मेट्रोमधील लढाईचे हे दृश्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या खेळापेक्षा कमी नव्हते. सार्वजनिक वाहतुकीत अशा प्रकारच्या कृत्यांचा नेटकऱ्यांकडून निषेध केला जात आहे. तर काही नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Viral Video | दिल्ली मेट्रोत दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी; प्रवाशांना फुकटात बघायला भेटला बॉक्सिंगचा थरार

सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासादम्यान प्रवाशांमध्ये वाद होणे हा काही नवा विषय नाही. अशा अनेक घडत असतात आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. दिल्ली मेट्रोत दोन प्रवासी मारामारी करत असल्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन प्रवाशी एकमेकांना तुंबळ हाणामारी करत आहेत. हा व्हिडोओ पाहताना एखादी व्यावसायिक बॉक्सिंग सामना पाहत असल्याचा अनुभव येत आहे.

व्हायरल व्हिडिओत दोन प्रवासी हाणामारी करत असल्याचा प्रकार अत्यंत नाट्यमय वाटत आहे. काही लोक हस्तक्षेप करून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काहीजण भांडण सुरु असल्याने आपल्या जागेवरून उभे राहिले आहेत.

हा व्हिडिओ अरहंत शेल्बी नावाच्या युजरने X वर पोस्ट केला आहे. नेटकऱ्यांसाठी दिल्ली मेट्रोमधील लढाईचे हे दृश्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या खेळापेक्षा कमी नव्हते. सार्वजनिक वाहतुकीत अशा प्रकारच्या कृत्यांचा नेटकऱ्यांकडून निषेध केला जात आहे. तर काही नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या दोन प्रवाशांमधील लढाई पाहून एकाने "पंच खूप प्रोफेशनल आहेत", असे म्हटले. तर दुसऱ्याने, "ऑलिम्पिकमध्ये जा, कमीत कमी देशाला गोल्ड मेडल मिळेल" असा खोचक सल्ला दिला आहे. एका युजरने म्हटले की, "बघणाऱ्यांकडून कोणीही पैसे जमा केले नाहीत...मोफत मनोरंज." एका जणाने "कोण जिंकले?", असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान, दिल्ली मेट्रोत दिवसेंदिवस अशा घटनांममध्ये वाढ होताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in