देशाच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू ; देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान

या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशभरातील एकूण 17 खासदारांचे मत फुटल्याचे समजते. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले.
देशाच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मू ; देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान
ANI

देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत 99 टक्के मतदान पार पडले. देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात शंभर टक्के मतदान झाले. 771 खासदार आणि 4025 आमदारांसह 4796 मतदारांनी राष्ट्रपतीपदासाठी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत मुर्मू आघाडीवर होत्या. तिसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांपैकी 50 टक्के मते मिळाली होती.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांनी देशाचा दौरा केला. मात्र मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्या. या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. 25 जुलै रोजी त्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत त्या 812 मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीपर्यंत मुर्मू यांना १३४९ मते मिळाली. या मतांची किंमत 4,83,299 आहे. दुसऱ्या फेरीपर्यंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली होती. या मतांची किंमत 1,89,876 आहे.

या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशभरातील एकूण 17 खासदारांचे मत फुटल्याचे समजते. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले. याचा परिणाम असा झाला की मुर्मूने शेवटपर्यंत आघाडी राखली आणि विजय मिळवला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in