द्रमुकचा जाहीरनामा आणि उमेदवारांची पहिली यादी घोषित

संपूर्ण भारतात आपले द्रविड मॉडेल बनवण्यासाठी हा निवडणूक जाहीरनामा मदत करेल. मला खात्री आहे की आम्ही तामिळनाडूमध्ये केवळ ४० जागा जिंकू शकत नाही, तर केंद्रातही आमची आघाडी जिंकेल, असा दावा द्रमुक खासदार कन्निमोळी यांनी केला आहे.
द्रमुकचा जाहीरनामा आणि उमेदवारांची पहिली यादी घोषित
Published on

चेन्नई : द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तसेच पक्षाचा जाहीरनामाही जाहीर केला. ते म्हणाले की द्रमुकने निवडणुकीपूर्वी जाहीरनामा बनवला आणि ती प्रथा सुरू ठेवली. आमच्या पक्षाच्या उपसरचिटणीस आणि माझ्या बहिणीने निवडणूक जाहीरनामा समितीचे नेतृत्व केले आणि तो तयार केला. कन्निमोळी यांनी राज्यभर फिरून विविध बाबी ऐकल्या. हा केवळ द्रमुकचा जाहीरनामा नाही तर लोकांचा जाहीरनामा आहे, असेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.

द्रमुकने उत्तर चेन्नईतून कलानिधी वीरसामी, दक्षिण चेन्नईतून तमिलाची थांगापांडियन आणि मध्य चेन्नईतून दयानिधी मारन यांना उमेदवारी दिली आहे. कन्निमोळी यांना थुथुकुडी मतदारसंघ देण्यात आला आहे, ज्यामधून त्या यापूर्वी जिंकल्या होत्या.

याशिवाय टी.आर. बाळू - श्रीपेरुंबतूर, जगथ्राचहान - अरकोनम, कधीर आनंद -वेल्लोर, अन्नादुराई - थिरुवनमलाई, यांचा समावेश आहे. तसेच धरणीमधून अरणी, सेलममधून सेलवागपती, प्रकाश इरोडमधून ए राजा निलिगिरी, गणपती राजकुमार कोवईमधून, अरुण मुरुरमुरे, पेरूनमला मुरझरा येथून निवडणूक लढवणार आहेत. थेनी येथील थांगा तमिळ सेल्वम आणि थेंकसी येथील राणी यांना उमेदवारी दिली गेली आहे.

द्रमुकच्या ६४ पानी जाहिरनाम्यानुसार चेन्नईमध्ये सर्वोच्च न्यायालयाची शाखा, तामिळनाडूसाठी विशेष योजना, पुद्दुचेरीसाठी राज्याचे अधिकार, तामिळमध्ये केंद्रीय परीक्षा, भारतात परतलेल्या श्रीलंकन तमिळांना भारतीय नागरिकत्व, संपूर्ण भारतातील महिलांसाठी एक हजार रुपये मासिक सहाय्य, समान नागरी संहिता लागू होणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे.

द्रविड मॉडेलसाठी उपयुक्त जाहीरनामा - कन्निमोळी

संपूर्ण भारतात आपले द्रविड मॉडेल बनवण्यासाठी हा निवडणूक जाहीरनामा मदत करेल. मला खात्री आहे की आम्ही तामिळनाडूमध्ये केवळ ४० जागा जिंकू शकत नाही, तर केंद्रातही आमची आघाडी जिंकेल, असा दावा द्रमुक खासदार कन्निमोळी यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in