कर्नाटकमध्ये डीआरडीओचे ड्रोन कोसळले

कर्नाटकमध्ये डीआरडीओचे ड्रोन कोसळले

तपास हे ड्रोन ‘रुस्तम-२’ या नावाने ओळखले जात होते

चित्रदुर्ग : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) तपास मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) रविवारी सकाळी कर्नाटकातील चित्रदुर्गातील एका गावाजवळील शेतात कोसळले. ड्रोनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते कोसळले. ड्रोनचे फार मोठे नुकसान झाले नसले, तरी त्यात काय तांत्रिक बिघाड झाला, याची चौकशी केली जाणार असल्याचे डीआरडीओकडून सांगण्यात आले.

‘तपास ०७ ए-१४’ नावाचे हे ड्रोन हिरियूर तालुक्यातील वड्डिकेरे गावाजवळ कोसळले. डीआरडीओने विकसित केलेल्या या तपास ड्रोनची चाचणी सुरू असताना ते कर्नाटकमधील एका गावात क्रॅश झाले. याबाबत संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अपघातस्थळी हे ड्रोन पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. डीआरडीओ या अपघाताची माहिती संरक्षण मंत्रालयाला देणार असून, अपघातामागील विशिष्ट कारणांचा शोध घेतला जात आहे.” चित्रांमध्ये खराब झालेले यूएव्ही आणि त्याची उपकरणे खुल्या मैदानात विखुरलेली दिसली. यापूर्वी तपास हे ड्रोन ‘रुस्तम-२’ या नावाने ओळखले जात होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in