‘डीआरडीओ’ने विकसित केले सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट, जवानांची सुरक्षा वाढणार; फोटो व्हायरल

या जॅकेटचा ‘फ्रंट हार्ड आर्मर पॅनेल’ (एचएपी) ७.६२ मिमी व्यासाच्या स्नायपर बंदुकीच्या सहा गोळ्या रोखू शकतो.
‘डीआरडीओ’ने विकसित केले सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट, जवानांची सुरक्षा वाढणार; फोटो व्हायरल

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) सर्वोच्च धोक्याच्या पातळीवरही टिकून राहणारे आणि वजनाने सर्वांत हलके असणारे बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे.‘डिफेन्स मटेरिअल्स अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’, कानपूरने हे बुलेटप्रूफ जॅकेट तयार केले आहे. ते दारुगोळ्यापासून संरक्षणासाठी देशातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अलीकडेच या बुलेटप्रूफ जॅकेटची ‘टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी’, चंदिगड येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे जॅकेट नवीन डिझाइन पद्धतीवर आधारित आहे. त्यात नवीन प्रक्रियेसह नवीन साहित्य वापरले गेले आहे. या जॅकेटचा ‘फ्रंट हार्ड आर्मर पॅनेल’ (एचएपी) ७.६२ मिमी व्यासाच्या स्नायपर बंदुकीच्या सहा गोळ्या रोखू शकतो. एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले ‘फ्रंट एचएपी’ हे पॉलिमर बॅकिंगसह मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटने बनलेले आहे. त्याने कारवाईदरम्यान जवानांची सुरक्षा आणि सुलभता वाढण्यास मदत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in