पाकिस्तानमधून आलेला ९ कोटी रुपये किमतीचा माल डीआरआयने केला जप्त; ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' अंतर्गत मोठी कारवाई करत पाकिस्तानमधून आलेला ९ कोटी किमतीचा माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. डीआरआयने १११५ मेट्रिक टन वजनाचे आणि ९ कोटी किमतीचे पाकिस्तानचे ३९ कंटेनर ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी आयातदार कंपनीच्या एका भागीदाराला २६ जून रोजी अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानमधून आलेला ९ कोटी रुपये किमतीचा माल डीआरआयने केला जप्त; ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट
Published on

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' अंतर्गत मोठी कारवाई करत पाकिस्तानमधून आलेला ९ कोटी किमतीचा माल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. डीआरआयने १११५ मेट्रिक टन वजनाचे आणि ९ कोटी किमतीचे पाकिस्तानचे ३९ कंटेनर ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी आयातदार कंपनीच्या एका भागीदाराला २६ जून रोजी अटक करण्यात आली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे होणाऱ्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. या प्रतिबंधांनंतरही, यूएईमार्गे पाकिस्तानमधून भारतात माल आयात केला जात होता.

न्हावाशेवा बंदरावर कंटेनर जप्त

भारतात येणारे हे कंटेनर यूएईचे असल्याचे भासवून आयात केले जात होते, परंतु त्यांना नवी मुंबईतील न्हावाशेवा बंदरावरच जप्त करण्यात आले. डीआरआयच्या तपासणीत असे समोर आले आहे की, हा माल पाकिस्तानमधील कराची बंदरातून दुबईच्या जेबेल अली बंदर मार्गे भारतात आणला जात होता. या आयातीमागे पाकिस्तानी आणि यूएईतील नागरिकांची मिलीभगत असल्याचे उघड झाले आहे. यात एक आर्थिक आणि लॉजिस्टिक नेटवर्क कार्यरत होते. यातून अवैध आर्थिक व्यवहार होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनी ट्रेलचा शोध

पाकिस्तानमधील व्यावसायिक संस्थांशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि पैशांचा मागही काढण्यात आला आहे. पाकिस्तानमधील व्यावसायिक संस्थांशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि मनी ट्रेलचाही शोध घेण्यात आला आहे. डीआयआरने सध्याची परिस्थिती लक्षात घेता 'ऑपरेशन सिंदूर' आणि गुप्तचर यंत्रणा आणखी मजबूत केल्या आहेत. गुप्तचर माहिती आणि डेटा विश्लेषण वापरून पाकिस्तानी मूळच्या वस्तूंच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in