तुम्ही निर्जळ उपवास करताय का? तुम्हाला माहीती आहे का तुमच्या शरिराला तुम्ही धोक्यात टाकत आहात. शरीराचे तापमान नीट ठेवण्यापासून ते शरीरातील हायड्रेशनची पातळी योग्य असणे हे फार महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने शरिरातील अनेक आजार आपोआप नाहीसे होतात, तर त्वचेच्या आणि केसांच्या समस्येपासूनही सुटका होते. दिवसभरात 2 ते 3 लीटर अर्थात 7-8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. कमी पाणी पिण्याने डिहायड्रेशनचा धोका उद्भवतो.
कमी पाणी पिण्याचे दूष्परीणाम-
पाणी कमी पिण्याचा सर्वाधिक परिणाम हा किडनीवर होत असतो. अनेक अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे. तसंच ज्या व्यक्तींना किडनी स्टोनची समस्या असते, त्या व्यक्तींनी सामान्य माणसाच्या तुलनेत अधिक पाणी प्यावे. 3 लीटरपेक्षा अधिक पाणी पिण्याची किडनीच्या रूग्णांना गरज भासते, जेणेकरून स्टोन लवकरात लवकर विरघळून युरीनमार्फत बाहेर पडू शकतो.
याव्यतिरीक्त कमी पाणी पिण्यामुळे लहान वयातच म्हातारपण येऊ शकते आणि अशा व्यक्तींना यामुळे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलसह क्रोनिक आजाराचा धोकाही संभवतो. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर त्याचा रक्ताभिसरण, त्वचा कोरडी पडणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि पाय दुखणे इत्यादी समस्या जाणवू शकतात.
दररोज किती ग्लास पाणी प्यावे?
दिवसातून 8 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल. कधीकधी लोकं जास्त खातात पण पाणी कमी पितात. पण, पाणी जास्त प्यायल्यानं शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी दररोज जास्त पाणी प्यावे. तसेच पाणी योग्य प्रमाणात प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. पिंपल्स येणे, पित्तं होणे इत्यादी समस्या पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यानं जाणवत नाहीत.