अयोध्येत ड्रोन, दहा हजार सीसीटीव्ही

पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी अयोध्या जिल्ह्यात दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती दिली आहे.
अयोध्येत ड्रोन, दहा हजार सीसीटीव्ही

लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिस अयोध्येच्या सुरक्षिततेबाबत खूप कटाक्षाचे प्रयत्न करीत असून २२ जानेवारीच्या समारंभात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी जागोजागी १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. तसेच आकाशातून ड्रोन कॅमेरे देखील घिरट्या घालण्यासाठी तत्पर ठेवण्यात येणार आहेत. तसेच संभाव्य ड्रोन आक्रमण टाळण्यासाठी अॅन्टी ड्रोन व्यवस्था देखील तैनात करण्यात येणार आहे. मंदिर परिसराच्या जवळपास अनधिकृत ड्रोनवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गौरव वन्सवाल यांनी दिली आहे.

पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी अयोध्या जिल्ह्यात दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे पोलिस सेवेत रुजू करण्यात आली आहेत. श्रीराम मंदीराकडे जाणारे सर्व रस्ते स्वच्छ केले असून सर्व अनधिकृत अतिक्रमणे उध्वस्त करण्यात आली आहेत. १७ ते १८ जानेवारीपासून अवजड वाहनांची दिशा बदलण्यात येणार असून वेळोवेळी बदलांची घोषणा करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in