हरयाणा, गोवा, लडाखला मिळाले नवे राज्यपाल

हरयाणा, गोवा, लडाखला मिळाले नवे राज्यपाल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी हरयाणा, गोवा आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या.
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी हरयाणा, गोवा आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या.

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, प्रा. अशिम कुमार घोष यांची हरयाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पुसपती अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी उपमुख्यमंत्री लडाखचे नवे राज्यपाल

जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांची लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लडाखचे नायब ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नवीन नियुक्ती करण्यात आली. त्यांचा राजीनामा स्वीकारत राष्ट्रपतींकडून गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in