दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमाने जयपूरला वळविली

दिल्ली विमानतळावर बुधवारी खराब हवामानामुळे चार उड्डाणे अन्यत्र वळविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमाने जयपूरला वळविली
PM

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर बुधवारी खराब हवामानामुळे चार उड्डाणे अन्यत्र वळविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. स्पाइसजेटची तीन आणि एअर इंडियाचे एक विमान जयपूरला वळविले. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही विमाने वळविण्यात आली. राजधानीतील अनेक भाग बुधवारी सकाळी दाट धुक्याने ग्रासले होते, ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मंगळवारीही दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावर विमानसेवा प्रभावित झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in